गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (19:45 IST)

तरुणीने लाईव्ह येत अक्खा साबण खालला, म्हणाली ...

सध्या सोशल मीडियावर आश्चर्यजनक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक तरुणी लाईव्ह येत अक्ख साबण खात आहे. या तरुणीच्या एका हातात साबणाची वडी आहे आणि दुसऱ्या हातात हँडवॉश आहे. दोघांचा वास घेऊन तिने जे काही केलं ते धक्कादायक आहे.  

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये तरुणीच्या एका हातात साबणाची वडी आहे. तर दुसऱ्या हातात हँडवॉश सोप आहे. थोड्याच वेळात महिलेने साबण खायला सुरु केले. साबणाची वडी खाऊन तरुणी आंनदी होते. थोड्याच वेळात खरे समोर येत. तरुणीने साबण म्हणून जे खालले ते खरे तर केक होते ज्याला साबणाचे आकार आणि रूप देण्यात आले होते. यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. 

तरुणीचा हा व्हिडिओ 21b_kolkata नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'मला साबण खायला आवडते' असे कॅप्शन लिहिले आहे. एका यूजरने लिहिले की, 'मला खरोखर वाटले की मी इंस्टाग्रामच्या विचित्र बाजूला पोहोचलो आहे.' आणखी एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'मी स्वत: साबण खाण्याची कल्पना करू शकत नाही.' नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. 
 
Edited by - Priya Dixit