सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (15:36 IST)

खासदाराचे महिला आमदाराशी गैरवर्तन, हात धरून खांद्यावर हात ठेवण्याचा व्हिडीओ व्हायरल

satish gautam
social media
कोल विधानसभा मतदारसंघात आमदार अनिल पाराशरतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणात आले असता या कार्यक्रमात अनेक भाजपचे अनेक नेते आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दयाशंकर सिंह, उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय उपस्थित होते.

या वेळी अलिगड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार सतीश गौतम यांनी स्टेजवर शेजारी बसलेल्या नगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता राजा यांच्या हातावर हात ठेवला आणि खांद्यावर पकडण्याचा  प्रयत्न केला. मंचावर भाजप खासदाराची ही कृती पाहून महिला आमदार चिडल्या. त्याचवेळी भाजप संसदेच्या मंचावर महिला आमदारासोबत केलेल्या या घाणेरड्या कृत्यानंतर संपूर्ण समाजाला लाजवेल अशा भाजप खासदाराचा निर्लज्जपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 
 
अलिगड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार सतीश गौतम आणि शहर मतदारसंघातील भाजप महिला आमदार मुक्ता राजा यांचा 11 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 11 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये भाजप खासदार सतीश गौतम अलिगड जिल्ह्यातील बरौली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार आणि राज्यसभा खासदार ठाकूर जयवीर सिंह यांच्या उजव्या बाजूला बसले होते. त्यानंतर भाजप खासदाराने भाजपच्या महिला आमदार मुक्ता यांना बसलेले पाहिले. आणि हळूच उठून त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि आपला हात त्या महिला आमदाराच्या हातावर ठेवला या वेळी ते थट्टा मस्करी करत होते. महिला आमदार मुक्ता राजा या नाखूष असल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या वर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रया दिल्या आहेत. 
यावेळी भाजप खासदाराच्या डाव्या बाजूला बसलेले राज्यसभेचे खासदार ठाकूर जयवीर सिंह देखील भाजपच्या महिला आमदारासोबत भाजप खासदार करत असलेल्या हालचाली पूर्ण डोळ्यांनी पाहत होते.
 
, शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला आमदार मुक्ता राजा यांचे पती संजीव राजा हे देखील शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. जिथे भारतीय जनता पक्षाने पत्नीला तिकीट देऊन दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. पत्नी आमदार झाल्यानंतर माजी आमदार संजीव राजा यांचे आकस्मिक निधन झाले.
 
भाजपने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की , आमदार मुक्ता राजा आणि खासदार सतीश गौतम यांच्यामध्ये आई-मुलाचे नातं आहे. काही विरोधकांनी या नात्यासाठी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे. या नात्याला त्यांनी वाईट दृष्टीने बघितले त्याची विचार करण्याची नियत वाईट आहे. 
 


Edited by - Priya Dixit