Marathi Biodata Maker
✕

हिच ती वेळ, हाच तो क्षण; सावरकर चर्चेचा विषय व्हावा...

Updated: सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (14:06 IST)
 
सोशल मीडियावर एकदा नजर फिरवली तर आपल्या लक्षात येईल की आता परिस्थिती बदललेली आहे. भारतात हिंदू वोटबॅंक नावाचा प्रकार नव्हता. पण आता तो होताना दिसत आहे. म्हणूनच लोकसभेच्या पराभवानंतर कॉंग्रेसने अधिकृतपणे सावरकरांना भारतरत्न द्यायला विरोध केलेला नाही.
 
निवडणूकीच्या वेळेस हिंदु वोट बॅंक लक्षात घेऊन राहुल गांधी अक्षरशः जनेऊधारी ब्राह्मण होऊन देवळात घंटा वजवत फिरत होते. पण त्यांनी सावरकरांवर टिका सुरु ठेवली होती. कारण त्यांना माहित नव्हतं की केवळ देवळात जाण्याने हिंदु वोट बॅंक तयार होत नाही. तुम्ही सावरकरांवर कोणताही संदर्भ न देता, केवळ राजकारणासाठी वा द्वेषासाठी टिका केली तर हिंदू ते सहन करणार नाहीत आणि मतपेटीतून त्याला उत्तर देतील हे आता कॉंग्रेसला कळून चुकले आहे. पण कव्हैयासारखे कम्युनिस्ट मात्र अजूनही तिच री ओढतायत. त्याचं कारण त्याच्याकडेही दुसरे मुद्दे नाहीत. सावरकर हे अतिरेकीवृत्तीचे होते हे दर्शवून त्यांना एका बाजूला काढायचं आणि गांधी, आंबेडकर आदि लोकोत्तर नेत्यांना एका बाजूला काढायचं हा प्रकार कॉंग्रेसने गेली ७० वर्षे केलेलाच आहे. तो प्रकार आता कन्हैया आदि तरुण डावे करत आहेत. पण हा प्रकार कालबाह्य झाला आहे हे कन्हैयाच्या व त्याला बोलते करणार्‍यांच्या अजून लक्षात आलेलं नाही. तसं असतं तर जितेम्द्र आव्हाडांच्या प्रचार सभेत वा रॅलीत "हमे चाहिये आझादी, गांधीवाली आझादी, आंबेडकरवाली आझादी" असले गाणे तो गात बसला नसता. गांधीवाली आझादी आणि आंबेडकवाली आझादी, दोन्ही वेगवेगळ्या होत्या. मुळात गांधी आणि आंबेडकर हे राजकीय विरोधक. आपण त्या मुद्द्याकडे नको वळूया. या लेखापुरते म्हणायचे तर सावरकरांना एका बाजूला सारुन इतर नेत्यांना दुसर्‍या बाजूला काढून सावरकरांना मानणारा वर्ग हा अतिरेकी आहे असा भासवण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. मुळात खोटं व संदर्भहीन बोलणार्‍यांना आवाज मोठा आहे आणि सावरकरांच्या बाजूने असणार्‍यांचा आवाज अजूनही खूप लहान आहे, हा महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे.
 
आता वेळ येऊन ठेपली आहे, जे डावे नाहीत त्यांनी पुढे येऊन चर्चा करण्याची व आपले मुद्दे समर्थपणे मांडण्याची. सावरकर हा चर्चेचा विषय होतोय हा आजच्या घडीला शुभशकुन आहे, कारण आता जग बदललं असल्यामुळे आणि डाव्यांना व कॉंग्रेसी संस्कृतीला लोक वैतागले असल्यामुळे सावरकरांची चर्चा होणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून कन्हैया कुमारने केलेलं विधान, राहुल गांधींनी खालच्या दर्जाची केलेली टिका आणि इतर सावरकर विरोधकांकडून होणारा, त्यांना भारतरत्न देण्यासंबंधीचा विरोध म्हणजेच भारताच्या नाट्यमय प्रवासातील एका नव्या अंकाची नांदी आहे. म्हणून मला असं प्रामाणिकपणे वाटतं की सावरकरांची चर्चा आता सातत्याने झाली पाहिजे. सावरकर अभ्यासकांनी यावर सतत लेख, व्याख्याने वा व्हिडिओ करुन प्रचार प्रसार करायला पाहिजे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी, इंग्रजीत सुद्धा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. इतकंच नाही तर डिबेट सारखे कार्यक्रम आयोजित करुन यावर सतत बोललं राहिलं पाहिजे. सावरकर हे एक असे क्रांतिकारक आणि समाजसुधारक आहेत ज्यांच्यावर सतत खोटी टिका होते आणि कारण नसताना त्यांना बाजूला सारलं गेलं. आता मात्र लोकांना मूर्ख बनवणं इतकं सोपं राहिलं नाही. सोशल मीडियाच्या या युगात लोक बुद्धिवादी आणि तर्कसुसंगत झाले आहेत. म्हणून बुद्धिवादी आणि तर्कसुसंगत असलेले सावरकर लोकांपुढे मांडणे हे हिताचे सुद्धा आहे... त्यामुळे हिच ती वेळ, हाच तो क्षण; आता सावरकरांची चर्चा झाली पाहिजे. लोकांना सत्य कळलं पाहिजे. हा सूर्य आणि हा जयद्रथ हे लोकांना कळलंच पाहिजे. त्यामुळे सारवकरांची चर्चा झालीच पाहिजे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात मंदिर परिसरात २ जणांची निर्घृण हत्या

मनोज जरांगे-एकनाथ शिंदे यांच्या 500 कोटी रुपयांच्या डील वादात ईडीची चौकशी करण्याची संजय राऊतांची मागणी

LIVE: मनोज जरांगे–एकनाथ शिंदे यांच्या कथित ५०० कोटींच्या डीलचा वाद पेटला, संजय राऊत यांनी केली ही मागणी

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपमध्ये सामील होण्याच्या चर्चावर भाष्य केले

नवी मुंबई विमानतळावरून फेब्रुवारी २०२७ पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार; इंडिगोच्या १२ विमानसेवा होणार स्थलांतरित!

पुढील लेख
Show comments