गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (09:38 IST)

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखवण्यास (एक्झिट पोल) बंदी घालण्यात आली आहे. 
 
निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.