शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (16:31 IST)

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याची घोषणा केली सोबतच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलिनीकरण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे यावेळी स्पष्ट केले. मागील काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची  मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले.