बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक नातू सुद्धा निवडणूक प्रचारात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी हेलिकॉप्टरने सभास्थळी पोहोचले होते. सर्वात महत्त्वाचं असे की संगमनेरमधील मंचावर महायुतीच्या बड्या नेत्यांसह एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे होय.
तेजस ठाकरे सुद्धा महायुतीच्या सभेला वडलांसोबत हजर राहिले आहेत. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सभांच्या निमित्ताने आज कोल्हापुरात गेले आहेत. तर आदित्य ठाकरे कोल्हापुरात, तेजस ठाकरे संगमनेरमध्ये असं आजचं चित्र होते. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणातून संसदीय राजकारणात उतरले आहेत.
राज्यभर दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरे आपण वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर वरळीसह महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचं म्हणत, राज्यभर प्रचाराला सुरुवात केली आहे.
एका बाजूने आदित्य तर दुसऱ्या बाजून उद्धव ठाकरे स्वत: प्रचार करत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबतीला धाकटा चिरंजीव तेजस ठाकरे सुद्धा सोबत दिसत आहे. त्यामुळे आता तेजस सुद्धा राजकारणात प्रवेश करतील असे चित्र आहे.