मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (15:16 IST)

तुझ्या बापाला जेलमध्ये टाकेल महिला आमदाराला धमकी वजा इशारा

putting your father in jail
सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रचारादरम्यान एका उमेदवाराने प्रणिती यांना ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही’ अशी धकमीच दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे असून, आडम हे मास्तर म्हणून ओळखले जातात. 
 
नरसय्या यांचा एका सभेदरम्यान तोल सुटला आणि त्यांनी प्रणिती यांना थेट धमकीच देवून टाकली आहे. की ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितले आहे. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.