1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:09 IST)

अमित शाह यांनी सावरगावात फोडला प्रचाराचा नारळ

Amit Shah burst into Savarga propagating coconut
विजया दशमीचा मुहूर्त साधत पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बीडमधील सावरगाव येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावत भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. अमित शाह यांना भगवानगड या ठिकाणी ३७० तिरंगी ध्वज फडकवून आणि ३७० तोफांची सलामी देऊन  मानवंदनाही देण्यात आली.
 
यावेळी अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच अनुच्छेद ३७० हटवणं शक्य झालं असं म्हणत पुन्हा एकदा भाजपालाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी भगवानगड या ठिकाणी केलं. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात, अशीच मात आपल्याला या निवडणुकीत करायची आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला निवडून द्यायच आहे असे देखील त्यांनी  उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले.
 
भारतातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३०० पेक्षा जास्त जागा मिळवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७० रद्द करुन अवघा देश एक केला. त्यांनी मागील सत्तर वर्षांमध्ये प्रलंबित होते ते निर्णय पाच महिन्यात मार्गी लावले असं म्हणत अमित शाह यांनी मोदींचं स्तुती केली तसंच त्यांचे हे कार्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांमध्ये पोहचवा असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.