मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (16:06 IST)

नाशिक पूर्व मतदारसंघात कोथरूड पॅटर्नची पुनरावृत्ती

नाशिकमधील एका राजकीय घटनेने महाराष्ट्राचे लक्ष वेधलं आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात कोथरूड पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे. याठिकाणी मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठींबा दिला आहे.
 
भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले बाळासाहेब सानप यांच्या पाठिशी विरोधक आपली ताकद उभी करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिक पूर्व मधून माघार घेतलेली मनसेचे अशोक मुर्तडक यांनी मला पक्षाने भरपूर काही दिले आहे. साहेबांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
 
सानप आणि मुर्तडक एकाच समाजाचे असल्याने मतविभागणीचे संकट दोन्ही पक्षांसमोर होते. मात्र, आता मनसेने माघार घेतल्यामुळे आणि अन्य विरोधकांच्या पाठींब्यामुळे इथं भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत आहे.