रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (15:59 IST)

प्रणिती शिंदे पाच किलोमीटर चालत जाऊन, रुपभावानी मातेचे घेतले दर्शन

सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या उमदेवार प्रणिती शिंदे यांनी तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन, रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं. सातरस्ता येथील आपल्या निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. भल्या पहाटे पाच वाजता आमदार प्रणिती शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या.
 
नवरात्रीच्या काळात प्रतीतुळजाभवानी म्हणून रुपभवानी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. तेच औचित्य साधून आमदार प्रणिती शिंदे यांनी रुपभवानी मातेचं दर्शन घेतलं.
 
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना तर युतीकडून शिवसेनेने दिलीप माने यांना तिकीट दिलं आहे. दिलीप माने हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे आजी-माजी काँग्रेस आमदाराची लढत सोलापूरमध्ये होत आहे.