सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (13:22 IST)

महाराष्ट्रात मोदींच्या 9 तर अमित शाहांच्या 18 सभा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9 तर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 18 सभा होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
 
चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ 9 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी 17 ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे.
 
त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी ही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं.