महात्मा गांधींना रिटायर करा - तुषार गांधी
"देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," असं वक्तव्य लेखक आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे.
"मध्य प्रदेशातील रेवा आश्रमातून महात्मा गांधींच्या अस्थी चोरण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या फोटोखाली 'गद्दार' लिहिण्यात आलं आहे. या घटनेला 3 दिवस झाले आहेत. देशाला नवीन 'राष्ट्रपिता' मिळाले असतील तर गांधीजींना रिटायर करण्याची वेळ आली आहे," अशी टीका तुषार गांधी यांनी केली आहे.
'गांधी : माणूस ते महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभादरम्यान औरंगाबादेत ते बोलत होते. गांधीजींच्या अस्थीचोरीच्या घटनेबाबत राजकीय पक्ष, गांधीवादी संस्था आणि प्रसारमाध्यमांनी मौन बाळगलंय, असा आरोप त्यांनी केला.