1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (16:01 IST)

गंगाखेडची एक जागा आम्हाला लढवू द्या : जानकर

Let us fight a place in Gangakhed:Jankar
भाजपने आम्हाला शंभर टक्के फसवलं असलं तरी शिवसेना-भाजप महायुतीतून ‘रासप’ बाहेर पडलेली नाही. शिवसेना-भाजपला 287 जागांवर मदत करणार आहोत, परंतु गंगाखेडची एक जागा आम्हाला लढवू द्या, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सांगीतल आहे. 
 
महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. रासपवर अन्याय झाला. आम्हाला महायुतीत दोन जागा सोडल्या. आमच्या चिन्हावर लढण्याचं भाजपने मान्य केलं होतं, पण आम्हाला बी फॉर्म देण्यात आला नाही. भाजपने  आमच्यासोबत धोका केला, असा आरोप जानकर यांनी केला.
 
 दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.