शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (09:11 IST)

कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना गांजा ओढण्याची परवानगी

कॅनडातील प्रसिद्ध ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या आवारात आता विद्यार्थी  गांजा ओढू शकतात. येत्या १७ तारखेपासून कॅनडात गांजा सेवनावरील बंदी उठवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात गांजा सेवनावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. विद्यापीठात विद्यार्थी थेट उघड्यावर गांजा सेवन करु शकणार नाहीत. त्यांना गांजा सेवनासाठी स्मोकिंग झोनप्रमाणे विशेष जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. 
 
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या वेंकुवर परिसरात उघड्यावरही गांजा सेवनाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाची मुख्य इमारत आणि निवासी इमारतींपासून ८ मीटरच्या परिसरात उघड्यावर गांजा ओढण्यावर निर्बंध आहेत. 
 
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट गोष्टीचे व्यसन असेल आणि त्याला रोखले तर लोक गैरमार्गाचा अवलंब करतात. यामधून अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही कोणतेही अडचणीचे नियम लादण्याच्या फंदात पडणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.