सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

Tiger Viral Video भरधाव वाहनाने धडक दिल्याने वाघ जखमी, नागझिरा येथील व्हिडिओ व्हायरल

Tiger Viral Video
Tiger Viral Video अनेकवेळा लोक जंगलाच्या मधोमध देखील भरधाव वेगाने वाहने चालवत निघून जातात. याचा फटका जंगलातील प्राण्यांना बसतो. अनेकदा वन्य प्राणी वाहनांच्या धडकेमुळे जखमी होतात तर अनेकांचा अपघातात मृत्यू होतो. 
 
अलीकडेच महाराष्ट्रातील भंडारा येथील नागझिरा अभयारण्यातून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे एका वेगाने जात असलेल्या वाहनाने वाघाला धडक दिल्याने वाघ गंभीर जखमी झाल्याचे दिसून येत आहे.
 
भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे- प्रिय मित्रांनो, वन्यजीवांच्या अधिवासात वन्यप्राण्यांचा पहिला हक्क आहे, त्यामुळे नेहमी सुरक्षित आणि सावकाश प्रवास करा. नागझिरा येथे या वाघाला एका वाहनाने धडक दिली.
 
व्हिडीओमध्ये वाघ जखमी अवस्थेत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.