शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (13:04 IST)

दोन चिमुकल्याची रस्त्यावरच कुस्ती रंगली, चिमुकल्यांच्या जबरदस्त कुस्तीचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर नवे नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ असे असतात जे  युजर्सची मनें जिंकतात. या शृंखलेत सध्या सोशल मीडियावर दोन चिमुकल्यांच्या कुस्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये दोन चिमुकले एका खुल्या मैदानात कुस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये ही चिमुकले मातीत बसून खेळत आहे आणि हे आपसात कुस्ती खेळताना दिसत आहे. त्या दोघांमध्ये एकमेकांना खाली पाडण्याची चढाओढ लागली आहे. त्यातील एका मुलाने पळ काढल्यावर दुसरा त्याला ओढतो आणि जमिनीवर पाडत आहे. या व्हिडिओला युजर्स ची पसंती मिळत आहे. काही युजर्स ने हा व्हिडीओ आपल्या सोशल अकाउंट वरून रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीच आहे आणि कुठला आहे हे समजले नाही.