रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अनोखी प्रथा, देवाला कांद्याचा नैवेद्य

राजस्थानातील चुरु जिल्ह्यात ददरेवा धाम येथील गोगाजी आणि गुरु गोरखनाथ मंदिरात अनेक वर्षांपासून नैवेद्य म्हणून देवाला कांदे अर्पण करण्याची प्रथा आहे. सध्या या देवस्थानात महिनाभर जत्रा सुरू असून सुमारे ५० ते ६० क्विंटल कांदे मंदिरात जमा झाले आहेत. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापासून येथे महिन्याभर चालणारी जत्रा भरते. या जत्रेत सुमारे चार ते पाच लाख भाविक येतात.
 
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी हनुमानगडमधील गोगामेडीजवळ महमद गजनवी आणि गोगाजी यांच्याच युद्ध झाले होते. तेव्हा गोगाजी यांनी देशातील विविध भागातून सैन्याला बोलावले होते. येथे आलेले सैनिक आपल्यासोबत कांदे आणि डाळ घेऊन आले होते. या युद्धादरम्यान कांद्याच्या रसदेमुळे सैनिकांना मोठा आधार मिळाला होता. कांद्याचे अनेक वैद्यकीय फायदेही आहेत. तसेच कांदा स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यानेही देवाला कांदा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.