गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (18:08 IST)

व्हायरल : ट्रक अंगावरून गेला आणि....

असं म्हणतात की जो पर्यंत काळ येत नाही तुम्हाला काहीही होऊ शकत नाही. कोणाचा काळ कधी आणि कुठं लिहिलेला आहे हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा लोक जीव देण्याचा प्रयत्न करतात तरीही त्यांना काहीच होत नाही आणि ते सुखरूप वाचतात. तर काही घरातच अपघाताला बळी होतात.   
 
सध्या सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये एक माणूस मुद्दाम एका ट्रक खाली येतो. आणि त्याच्यावरून ट्रक जाऊन देखील तो चक्क उठून उभा राहतो. हा अपघात ज्यांनी बघितला त्यांना आश्चर्याचा ढकच पोहोचला आहे. 
 
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर क्रेझी ट्विट्स नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुसाइड फेल’. 22 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत कित्येक हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकला कसा रोखण्याचा प्रयत्न करतो, जो कदाचित कचऱ्याचा ट्रक आहे. मात्र, ट्रक थांबत नाही, तेव्हा तो ट्रकच्या पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत ट्रक पुढे सरकतो. मग हे पाहून तोही थोडा पुढे जातो आणि अचानक ट्रकच्या चाकाखाली पडतो.ट्रक त्याच्या अंगावरून जातो. आपल्याला 2 सेकंद असं वाटतं, हा आता गेला! आता काय हा वाचत नाही. पण चमत्कार होतो. तो माणूस ट्रक अंगावर जाऊन सुद्धा वाचतो. ट्र्क त्याच्या अंगावरून जातो आणि तो गेल्यानंतर हा माणूस चक्क उठून बसतो. हे आश्चर्यकारकचं आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.