1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (11:11 IST)

काय सांगता, उडत्या विमानात बांधली लग्नगाठ

marriage knot tied in a flying plane
लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असून या दिवसाची प्रत्येक जण वाट बघतात. लग्न झाल्यावर नववधू आणि नवरदेवाचं आयुष्य बदलते. सध्या लग्नसरायमध्ये  दोन्ही पक्ष आपापल्या हौशी पूर्ण करतात. प्रत्येकाला असं वाटते की त्यांच्या लग्नात काही हटके व्हावं. जेणे करून ते नेहमीसाठी लक्षात राहील. सध्या डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे प्रस्त आहे. स्वतःच्या लग्नासाठी जोडपे नवी नवी ठिकाणे शोधतात. मात्र युएईच्या एका भारतीय व्यावसायिकाने आपल्या मुळीच लग्न चक्क विमानात लावले. या लग्नसोहळ्याची चर्चा सध्या होत आहे. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

युएई मधील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक दिलीप पोपळे हे दुबईत राहतात. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न हटके करण्याचे स्वप्न बघितले होते त्यानुसार त्यांनी आपल्या मुलीचे लग्न, दुबई ते ओमानच्या तीन तासांच्या प्रवासात 350 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये सर्व व्हराडी मंडळी गाण्यावर नाचत आहे. विमानात सजावट करण्यात आली असून सर्व लग्नाचा आनंद घेत आहे. दिलीप यांचे स्वतःचे लग्न देखील विमानातच झाले होते. आता त्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न देखील विमानात केले.
 
Edited by - Priya Dixit