1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (09:11 IST)

रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा

Application of Ramtech candidate rejected; Now a new face
महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेकच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला. विशेष म्हणजे शिवसेनेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीने रद्द ठरविले. सकाळी समितीने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर, संध्याकाळी त्यांचा उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला आहे. त्यामुळे, काँग्रेसला निवडणूकपूर्व मोठा धक्का बसला आहे.
 
सरकारने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र, आता अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवला आहे. त्यामुळे, रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणुकांच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. काँग्रेसने येथील मतदारसंघात प्लॅन बी म्हणून रश्मी यांचे पती शामकुमार यांचा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे, रामटेकच्या या जागेवर आता श्यामकुमार बर्वे निवडणूक लढवणार आहेत.
 
Editedb by Ratnadeep Ranshoor