बारामतीत मतदान संपतातच वारजे परिसरात हवेत गोळीबार
काल महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक झाली. बारामती मतदार संघात देखील काल निवडणूक झाली. मतदान संपल्यावर वारजे परिसरात हवेत गोळीबार करण्यात आला. वारजे परिसराचा समावेश बारामती मतदार संघात येतो. या गोळीबाराचे नंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
वारजेच्या रामनगर परिसरात हवेत गोळीबार झाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास दिली. घटनेची माहिती मिळतातच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथक घटनास्थळी पोहोचले.
रामनगर भागातील शक्ती चौकात रात्री 10:45 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी परिसरात हवेत गोळीबार केला. गोळीबार करून आरोपी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने पसार झाले.आरोपींची हवेत गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Edited By- Priya Dixit