बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 24 मार्च 2024 (12:56 IST)

Congress Candidate List: सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर

congress
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह राजगड लोकसभा मतदारसंघातून, यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय वाराणसीतून, इम्रान मसूद सहारनपूरमधून, वीरेंद्र रावत हरिद्वारमधून आणि दानिश अली अमरोहामधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने राजस्थानमधील नागौरची जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासाठी (आरएलपी) सोडली आहे. 
 
या यादीत मध्य प्रदेशच्या 12, उत्तर प्रदेशच्या नऊ, तामिळनाडूच्या आठ, महाराष्ट्राच्या चार, राजस्थानच्या तीन, मणिपूर, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी दोन लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, अंदमान-निकोबार आणि मिझोराममधील प्रत्येकी एका लोकसभा जागेसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
 
Edited By- Priya Dixit