शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (17:26 IST)

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

loksabha elections 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दिंडोरी येथील जाहीर सभेला संबोधित करताना ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता भावुक झाले. ते म्हणाले, मोदी हे वंचितांच्या हक्काचे चौकीदार असून कोणाला त्यांचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही. भारताने ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसशी लढा दिला त्याचे सर्व जगात कौतुक होत आहे. मोदींनी गरिबांना राहण्यासाठी कयमस्वरूपी घर दिले, प्रत्येक घराला वीज कनेक्शन दिले, महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले. प्रत्येकासाठी योजना तयार केला प्रत्येकाला योजनांचा लाभ दिला. यात आम्ही कोणाचा धर्म पहिला नाही. 

पंतप्रधान म्हणाले, देशातील सरकारांनी बनवलेल्या अर्थसंकल्पातील 15 टक्के रक्कम अल्पसंख्याकांवरच खर्च करावी, म्हणजेच अर्थसंकल्प धर्माच्या आधारावर विभागला जावा, अशी काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यांनी धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली आणि आजही ते धर्माच्या आधारावर विविध फाळणी करत आहेत.
 
ही बनावट शिवसेना उद्धव ठाकरे बनावट राष्ट्रवादी पक्ष(शरद पवार) काँग्रेस पक्षात विलीन होणार हे निश्चित आहे. ही बनावट शिवसेना जेव्हा काँग्रेस मध्ये विलीन होईल त्या दिवशी मला बाळासाहेबांची आठवण येईल. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर चालायला सुरुवात करेल त्या दिवशी आपली शिवसेना संपुष्टात येईल असा विश्वास बाळासाहेबांना होता. आज जे काही शिवसेनेचे चालले आहे त्याचे सर्वात जास्त दुःख बाळासाहेबांना झाले असावे. असे ते म्हणाले. 

Edited by - Priya Dixit