1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2024 (09:46 IST)

बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही-अजित पवार

ajit panwar
अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे कुटुंबीय सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातला प्रचार रंगात आला आहे. पवारांच्या सुनेला संधी द्या, असे आवाहन उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केले आहे. अशातच त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार आणि तुमच्यातील जुन नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का? यावर अजित पवार म्हणाले की, 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे जनता आता संभ्रमात साडपली आहे.

शरद पवार आणि तुमच्यातील जुन नातं पुन्हा पूर्वीसारखं होणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, एकदा 7 तारखेला बारामतीचं मतदान होऊ द्या. तोपर्यंत मी या विषयावर काहीच बोलणार नाही. कारण सध्या बारामतीत वेगळा प्रचार सुरू आहे. 
 
आम्ही यापुढे एकत्र येणार असे सांगून लोकांना बुचकाळ्यात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मी जी राजकीय भूमिका घेतली आहे, त्यावर मी ठाम राहणार आहे, हा संदेश माझे मतदार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला पाहिजे. जर असे झाले तर लोक मला साथ देतील, मोठे आशीर्वाद देतील आणि मतदार मला भरभक्कम पाठिंबा देतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor