उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार
देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या म्हणजेच शनिवारी जाहीर होणार आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत याची घोषणा करणार आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाकडून याबाबत सोशल मिडिया X वर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाऊ शकतात. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील की नाही? हेही उद्या स्पष्ट होईल. निवडणुकीच्या तारखांची घोषणा ECI च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाईल.
Edited by - Priya Dixit