गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:18 IST)

राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निघाले आदेश

maharashtra police
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अखेर राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस महासंचालक कार्यालयाला कराव्या लागल्या. याबाबतचे आदेश  काढले.  
 
निवडणुकीशी संबंधित जबाबदारी असलेल्या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला दिले होते. असे असतानाही अनेकांच्या बदल्या जिल्ह्यातच केल्या. हे प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय लवादात (मॅट) गेले होते. शेवटी आयोगाच्या आदेशाविरुद्ध झालेल्या बदल्यांची पडताळणी आयोगाने केली. त्यानंतर २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. यात छत्रपती संभाजीनगर शहर, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आदी ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor