गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2024 (18:47 IST)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये राडा

bachhu kadu
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून अमरावतीमध्ये राडा झाला. सभेसाठीच्या मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरु झाला आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी बच्चू कडू यांनी 23 आणि 24 अशा दोन तारखा बुक केल्या आहे. मात्र आता या ठिकाणी अमरावतीचे भाजपचे उमेदवार नवनीत राणा साठी अमित शाह सभा घेणार आहे. पोलिसांनी अमित शाह यांच्या सभेसाठी सायन्स कोर मैदान ताब्यात घेतला आहे.  

हे बच्चू कडू यांना समजल्यावर ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तिथे आले. या नंतर पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात वादावादी सुरु झाली.बच्चू कडू म्हणाले आमच्या कडे रीतसर परवानगी आहे त्यामुळे मैदानाचा ताबा आम्हाला द्या. 

अमरावती लोकसभा मतदार संघात चौरंगी सामना होणार आहे. नवनीत राणा या मतदार संघात बीजेपीच्या उमेदवार म्हणून आहे. तर काँग्रेस ने इथून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवार म्हणून निवडले आहे. तर आंनंदराज आंबेडकर देखील या निवडणुकीत उतरले आहे. 
अमरावती मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी गृहमंत्री अमितशाह नवनीत राणांसाठी प्रचारसभा घेणार आहे. 
 
Edited By- Priya Dixit