1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (20:30 IST)

राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना लिहिले पत्र, ही संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेसचा कार्यकर्त्यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले- मित्रांनो ही लोकसभेची निवडणूक सामान्य नाही ही लोकशाही आणि संविधान वाचव्यासाठीची लढा आहे. आम्ही एक नाही कोटींच्या संख्यने आहोत आम्ही एकत्र लढू, जिंकू आणि देशाची परिस्थिती बदलू. जो पर्यत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता सत्यतेच्या बाजूने उभा आहे. तो पर्यंत भारतात द्वेषाच्या विजय होणार नाही. 

त्यांनी लिहिले ही निवडणूक सामान्य नसून हा लढा आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा. एका बाजूला काँग्रेसची प्रेम आणि न्यायाची विचारसरणी आहे. तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकार, भाजप आणि आरएसएसची भीती. द्वेष आणि विभाजनाची विचारसरणी आहे. 

या लढामध्ये काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे ते आहे तुमच्या सारखे निष्ठावंत कार्यकर्ते. तुम्ही आत्ता पर्यंत पक्षासाठी केलेल्या मेहनतीबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्यामुळे आम्ही भारतातील लोकांचे म्हणणे ऐकून जाहीरनामा तयार  केला. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात आम्ही चांगला लढा दिला. भाजपच्या खोट्या गोष्टींना विरोध  करण्यास आम्ही सक्षम आहोत. 

आमची हमी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावी आणि प्रत्येकजण मतदानासाठी बाहेर पडेल याची खात्री करण्यासाठी आणखी एक महिना कठोर परिश्रम करण्याची वेळ आली आहे. आपण सर्व मिळून काँग्रेसचा संदेश आणि आपली हमी प्रत्येक गाव, परिसर, गल्ली आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया. आता घरोघरी जाण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक तरुण, महिला, मजूर, शेतकरी आणि वंचित कुटुंबापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. भाजपची विचारसरणी आणि त्यांचा द्वेषाचा अजेंडा यातून निर्माण झालेला धोका आपण स्पष्ट केला पाहिजे. या लढ्यात मी माझे सर्वस्व देत आहे आणि मला तुमच्याकडून तेच हवे आहे.आपण सर्व मिळून लढू आणि जिंकू आणि देशाची परिस्थिती बदलू आपल्या प्रेम समर्पण साठी कृतज्ञता.
 
Edited By- Priya Dixit