शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2024 (19:41 IST)

शिक्षकांचा अर्धा पगार तुम्हाला, अर्धा आम्हाला, नितीन गडकरींचा लातूरच्या सभेतून काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

nitin gadkari
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची लातूर येथे सभा झाली.लोकसभेच्या लातूर मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी निलंगा येथे आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांची नक्कल करत  हल्लाबोल केला. ते म्हणाले की काँग्रेस ने गरिबी हटाओ -गरिबी हटाओ म्हणत काही विशिष्ट लोकांची गरिबी दूर केली आहे.काँग्रेसच्या काळात शिक्षकांचा अर्धा पगार तुम्हाला आणि अर्धा आम्हाला मिळतो. जनतेच्या मध्ये आल्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. 

काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले नेहरूजींच्या काळात ते म्हणाले गरिबी हटाओ, इंदिराजींच्या काळात त्या म्हणाल्या गरिबी हटाओ, राजीव जी म्हणाले गरिबी हटाओ, नंतर सोनियाजी म्हणे गरिबी हटाओ. राहुलजी म्हणतात गरिबी हटाओ पण गरिबी कोणाची कमी झाली.त्यांच्या काळात काही विशिष्ट लोकांची गरिबी कमी झाली आहे. 
काँग्रेसनं 80 वेळा संविधान तोडण्याचे पाप केलं आहे. संविधानची मूलभूत तत्वे हे कधीही बदलले जाऊ शकत नाही. आणीबाणीच्या काळात संविधानची ऐसी -तैसी काँग्रेसने केली आहे. आमच्या विरोधात ते प्रचार करतात.
नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. नागपूर मतदारसंघात निवडणूक झाली आहे. गडकरी हे पक्षासाठी आणि मित्रपक्षांसाठी प्रचार करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit