सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2024 (12:00 IST)

जय भवानी शब्द गाण्यातून काढणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचावर निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, दोन्ही नेते सातत्याने आचारसंहितेचा अवमान करत आहेत.

ते म्हणाले अमित शहा सभेत म्हणाले तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला रामललाचे दर्शन घडवू. बजरंबळीचे व घेऊन मतदान करा. असे पंतप्रधान कर्नाटकाच्या सभेत म्हणाले. दोन्ही नेते सातत्याने आचारसंहितेचा अवमान करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई झाली? निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून गाण्यातील 2 शब्द काढायला सांगितलं आहे. जय भवानी.. जय शिवाजी ही घोषणा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आहे. मला गाण्यात बदल करण्यासाठी सांगण्यात आले आहे. हा भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदैवत आहे. हा देवीचा अपमान नाही का? 

आम्ही गाण्यातून जय भवानी शब्द वगळणार नाही. आज ते गाण्यातून जय भवानी शब्द काढायला म्हणत आहे उद्या जय शिवाजी म्हणणं देखील बंद करतील. आम्ही निवडणूक आयोगापुढे झुकणार नाही. निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यावर कारवाई करावी.आम्ही गाण्यात वापरलेले शब्द काढणार नाही

Edited By - Priya Dixit