शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:26 IST)

महाराष्ट्रातील ८ गावांच्या गावक-यांनी थेट मतदानावर बहिष्कार इशारा

Villagers of 8 villages in Maharashtra warn of boycott of direct voting
महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिलला होणार आहे. असे असताना महाराष्ट्रातील ८ गावांच्या गावक-यांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
 
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेचा गेल्या १० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. पण या याचिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय लागत नसल्याने आमगाव येथील नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्काराच्या निर्णयावर आज आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली.
 
काही नागरिकांचा बहिष्कारास विरोध
एका बाजूला आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या ८ गावांतील नागरिक हे बहिष्कार करण्याच्या बेतात आहेत. मात्र स्थानिक पातळीवर अनेक पक्षांचे समर्थक याला विरोध दर्शवित असल्याचे दिसून आले आहे. कारण हा प्रश्न राज्य शासनाशी संबंधित आहे. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस आपण सर्व मिळून बहिष्कार टाकू, अशी भूमिका काहींनी मांडली आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor