मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By वेबदुनिया|

वरुण गांधींना फायदाच!

पं.अशोक पवार 'मयंक'

PTIPTI
स्वर्गीय संजय गांधी व भाजपची खाजदार श्रीमती मेनका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी प्रक्षोभग वक्तव्य केल्याने सध्या तुरूगांची‍ हवा खात आहेत. लोकसभा निवडणुकीत पीलीभीत येथील भाजपचा उमेदवार वरूण गांधी आज तुरूंगात असले तरी त्याच्यासाठी हा काळ फायदा मिळवून देणारा आहे. ग्रहाचे पाठबळ उत्तम असल्याने तरूंगात असून वरुणचा आत्मविश्वास अजुनही बुलंद आहे.

वरूणवर प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवल्याने पोलीसानी त्याच्याविरूध्द गुन्हा नोंदवून त्याला तरूंगात टाकले आहे. या प्रकरणावरून वरुण भविष्यात वादग्रस्त नेता बनू शकतो, असे त्याच्या ग्रहांच्या स्थितीवरून सांगता येईल. कांग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी म्हटले की, वरुण भाजपसाठी प्रवीण तोगडीया होऊ नये.

वरूण गांधीच्या जन्मा वेळी वाणी (द्वितीय) भावात अष्टमेश सूर्य व भाग्येश षष्टेश बुधसोबत केतु विराजमान आहे. या स्थितीत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे वरूण अवघड जात आहे. वाणीमध्ये केतु असणे ही प्रभावशाली व्यक्तीची ओळख आहे. अशा ग्रह स्थिती असलेल्या व्यक्तीचा आवाज कणखर असतो. त्यामुळेच भाजपकडून आधी वरुणला डावलेले जात होते. आता मात्र तेच भाजप वरुण गांधीच्या सोबत आहे.

वरूणच्या पत्रिकेत दशमेश शुक्र ही केतुसोबत नक्षत्र अश्विनमध्ये आल्याने चतुर्थ भावात आहे. हिन्दुवादी नागरिकांचे नेतृत्त्व करणार्‍या वरूणचा भाजपाला चांगला फायदा करून घेता येणार आहे. तसे पाहिले तर वरूण गांधीच्या पत्रिका विपरित राजयोगाचे योग दिसत आहे.

विपरित राजयोगाचे चिन्ह दिसत असणारा व्यक्ती स्वबळावर उच्चपद प्राप्‍त करत असते. वरूणच्या पत्रिकेत सूर्य, बुध, गुरु व शनि वक्री आहेत. वक्री ग्रहाचे फळ लवकरच मिळते. भाजपने जर हाच मुद्दा उचलून धरला तर दिग्विजय सिंग यांचे म्हणणे ही खरे ठरू शकेल. सध्या ग्रहाची स्थिती पाहिली तर वरुणला फायदाच फायदा आहे.