बुधवार, 30 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Modified: मंगळवार, 29 एप्रिल 2025 (18:16 IST)

Dada Vahini Anniversary Wishes Marathi दादा वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमची जोडी नेहमी सुखात राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Dada - Vahini
 
दादा आणि वहिनी तुम्ही दोघे माझ्यासाठी श्रीराम आणि देवी सीतेप्रमाणे आहात
तुम्हा दोघांची माया आणि आशीर्वाद माझ्यावर आयुष्यभर कायम राहू द्या. 
Happy Marriage Anniversary
 
उगवता सूर्य, बहरलेले फुल, उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद उगवत,
बहरत आणि उधळत राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दादा तुझ्या रूपात मला वडील दिसतात
वहिनी तुझ्या रूपात मला दिसते आई,
तुमच्या प्रेमाची माया माझ्यावर
कायम अशीच राहू द्या
दादा वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
दादा आणि वहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्या
प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो,
तुम्हाला दोन्ही घरचे प्रेम भरभरून मिळो,
सुख, समृद्धी, यश आणि वैभव तुमच्या दारी नांदो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नात्याने दादा- वहिनी
पण आहे मात्र
आई-बाबा
तुमच्या मायेच्या सावलीत
मला असेच राहू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दादा तू आणि वहिनी माझे सर्वात जवळचे मित्र आहेत
तुम्हा दोघांसोबत मी माझ्या आयुष्यातील सुख दुखाचे क्षण व्यतीत केले आहेत,
तुम्हा दोघांची माया माझ्या सोबत नेहमी राहो
आणि आज तुमचा हा खास दिवस सुखाचा जावो
Happy Marriage Anniversary
 
बागेत फुल एकमेकांसोबत कसे सुंदर दिसतात
तसेच, तुम्ही दोघेही एकत्र छान दिसता
Happy Anniversary Dada Vahini
 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
Happy Anniversary Dada Vahini
दिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनी
 
दोघांची जोडी देवाची कृपा आहे
जी तुम्ही प्रेम आणि त्यागाने जपलं आहे
कधी कमी न होवो हा प्रेमाचा ज्वर
नेहमी कायम राहो हा प्रेमाचा बहर