गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (11:43 IST)

Funny Messages in Marathi लग्न वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

जेव्हा माझ्या वाढदिवसाला कोणी
HBD असं लिहून पाठवतं
तेव्हा मी देखील त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला
HA HA HA लिहून पाठवून देतो...
******************
नशीब आणि पत्नी नक्कीच त्रास देतात,
पण जेव्हा आविष्य घडवतात जेव्हा साथ देतात...
******************
पत्नीच्या गुलामगिरीचे आणखी एक वर्ष पूर्ण झाले,
म्हणून लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
******************
बायकोच्या गालावर गुलाबाचं फुलं मारल्यावर
इंग्लिश वाइफ : यु आर सो नॉटी!
पंजाबी वाइफ : तुसी वड़े रोमेंटिक लगते हो!
मराठी वाइफ : मेल्या, आता काय डोळा फोडशील माझा....
******************
बायको - आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज मी चिकन बनवते,
नवरा - चालेल. पण आपल्या चुकीची शिक्षा चिकनला का देत्येस?
******************
मी इतकी आनंदी आहे की,
जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला.
******************
लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते.
जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागते.
******************
तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप.
हाच दिवस होता तो खास
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
******************
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो
******************