शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (09:30 IST)

महाराष्ट्रात या महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सभेत भाषणात तसे संकेत दिले आहे. तसेच या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 
 
काल मुंबईतील बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे संकेत दिले आहे. येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, अशा परिस्थितीत सर्वांनी महायुतीला साथ द्यावी आणि प्रेम करावे, असेही शिंदे म्हणाले. मुंबईतील चांदिवली परिसरात काल एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पण निवडणुकीबाबत कोणताही निर्णय निवडणूक आयोगच घेईल.