रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (11:58 IST)

हिम्मत असेल तर समोर येऊन जोडे मारा, अजित पवार माविआच्या आंदोलनावर संतापले

ajit panwar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात राजकोटच्या किल्ल्यावर नौदलाने बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते करण्यात आले. 
पुतळा कोसळल्याबद्ल राज्य सरकार आणि नरेंद्र मोदींनी जनतेची माफी मागितली. या प्रकरणावरून विरोधी पक्षाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. 

पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी कडून याचा निषेध म्हणून रविवारी सरकारला जोडे मारो आंदोलन केले आणि मोर्चा काढला.या मोर्च्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार, नाना पाटोळे हे उपस्थित होते. या वेळी उद्द्भव ठाकरे महायुतीच्या पोस्टरला जोडे मारताना दिसले. या वर प्रतिक्रिया देत अजित पवारांनी माविआच्या नेत्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. 

बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते  म्हणाले, काही लोकांनी आमच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे.आमच्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माझ्या फोटोला चपला मारल्या आहे. हिम्मत असेल तर पुढे येऊन चपला मारा.पाठीमागे काय करताय.या पुढे मग मी दाखवतो. अशी फसवणूक का करत आहात. 
बारामतीत एका सभेला संबोधित करताना त्यांनी माविआचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, कोणती सरकार अशी घटना व्हावी असा विचार करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळने हे दुर्देवी आहे. एखादा महापुरुषाचा पुतळा कोसळावा अशी इच्छा कोणाची नसेल. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. जे काहीही झालं आम्ही जनतेकडून त्या बद्दल माफी मागितली आहे. या वर राजकारण करण्याची काहीच गरज नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा दिली जाईल. 
Edited by - Priya Dixit