गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2024 (11:35 IST)

महाराष्ट्र पूर की निवडणुकीची रणनीती?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानी मध्यरात्री झाली बैठक

shinde panwar fadnavis
सध्या महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री 1:30 वाजता बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. 

राज्यातील पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बैठकीत विधानसभा निवडणुकीवर चर्चा होण्याचे म्हटले आहे. 
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या मुळे परिस्थिती गंभीर होत आहे. 

मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी सुमारे दीड तास बैठक झाली. रात्री दोन वाजेच्या नंतर फडणवीस आणि अजित पवार हे मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर पडले.  
 
राज्यातील मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून सर्वत्र पाणी साचले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर असे अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहे. पिंपरी- चिंचवडतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागात घरात पाणी शिरले असून पुण्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी परिस्थितीशी लढण्यासाठी ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटप बाबत चर्चा झाली असून अद्याप तिन्ही पक्ष एकमत झाले नाही.मात्र या बैठकीचा अजेंडा पाऊस आणि पूर असल्याचे सांगितले जात आहे.मात्र अद्याप हे स्पष्ट झाले नाही.   
पूरसदृश्य भागातील बाधितांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. 
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल बचाव कार्यात गुंतले आहे. 
 
Edited By- Priya Dixit