सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (11:13 IST)

अजित पवारांना महाराष्ट्रात 80-90 जागांवर निवडणूक लढवायची आहे, अमित शहांकडे मागणी

ajit panwar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींना घेऊन भाजप महायुती मध्ये सीट वाटपावरून चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांनी दिल्ली मध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. व त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. अजित पवारांना वाटते की, लवकरात लवकर सीटांचे वाटप व्हावे. 
 
अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर भाजप वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दिल्ल्लीला पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार या भेटी महायुतीमध्ये सीट वाटपासाठी झाली असावी. 
 
गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीमध्ये अजित पवार यांनी लवकर सीटांचे वाटप व्हावे या मुद्द्यावर जोर दिला. तसेच सांगितले जाते आहे की, अजित पवार यांना 80-90 सिटांवर निवडणूक लढवायची आहे.