1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Fadnavis warns Anil Deshmukh I will make the audio tape public if he falsely accuses me

फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा, माझ्यावर खोटे आरोप केल्यास ऑडिओ टेप सार्वजनिक करेन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्याकडे गृहमंत्रालय आहे, फडणवीसांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना इशारा दिला की, देशमुख यांनी आपल्यावर खोटे आरोप केले तर तेही गप्प बसणार नाहीत. फडणवीस म्हणाले की, विभाजनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी "मला त्यांच्या काही ऑडिओ टेप दिल्या आहेत, ज्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सचिन वाढे यांच्याबद्दल बोलत आहेत".
 
 उपमुख्यमंत्री म्हणाले की, जर देशमुख आपल्यावर खोटे आरोप करत राहिले तर ते ऑडिओ टेप सार्वजनिक करू. तसेच फडणवीस म्हणाले  की,"जर मला पुन्हा कोणी टार्गेट केले तर मी त्यांना कधीही सोडणार नाही."
 
मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुख सध्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात जामिनावर आहेत. फडणवीस म्हणाले की, “कोणी खोटे आरोप करून कथा रचत असेल तर मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही, हे त्याला कळायला हवे.
पुढील लेख
भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?