गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (09:21 IST)

बाबा सिद्दिकींचा मुलगा जिशान सिद्दिकींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार जिशान सिद्दीकी याना ऑगस्टमध्ये काँग्रेसने काढून टाकले होते. जीशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे युबीटीचे वरुण सरदेसाई यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात.
 
तसेच जीशान सिद्दीकी हे मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहे. जिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वांद्रे पूर्व मतदारसंघातून जिशान सिद्दीकी यांना पक्षाचे उमेदवार म्हणून तात्काळ घोषित केले.