जागावाटपाच्या वादात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांना भेटले
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होणार असून 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अद्याप माविआ मध्ये जागावाटपाचा घेऊन मतभेद सुरु आहे.
या वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपावरून सुरू असलेली कोंडी सोडवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली.
काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात जागावाटपावरून मतभेद असल्याच्या बातम्या सुरु आहेत.महाविकास आघाडीत कोणताही वाद नसून उर्वरित जागांसाठी चर्चा सुरू असल्याचे थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याने सांगितले की ते मंगळवारी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.
थोरात म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याबाबत दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
याआधी सोमवारी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले होते की, महाविकास आघाडीने 288 पैकी210 जागा वाटपावर सहमती दर्शवली होती, तर पटोले यांनी 96जागांवर चर्चा पूर्ण झाल्याचा दावा केला होता
Edited By - Priya Dixit