मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (14:06 IST)

अजित पवारांना मोठा धक्का,साताऱ्याचे दीपक चव्हाण आणि संजीवराजे निंबाळकर यांनी राजीनामे दिले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असून विधानसभा निवडणुकीपूर्व अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साताऱ्याचे दीपक चव्हाण आणि संजीवराजे निंबाळकर या दोन बडे नेत्यांनी पक्षातून राजीनामा दिला असून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. 
दीपक चव्हाण हे फलटण मतदार संघातून तीन वेळा आमदार होते. त्यांनी शरद पवारांच्या पक्षात शरद पवार सभेला संबोधित करत असताना हा म्हतारा आता थांबणार नाही  खूप पुढे जाईल आणि महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले होते.

विधानसभाच्या पार्शवभूमीवर येत्या काही दिवसांत आचार संहिता लागण्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षाचे नेते पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे. 

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराव निंबाळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार पक्षाची साथ सोडत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.ते आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहे.  त्यांचा सह फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील अजित पवारांच्या पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्व हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 
Edited By - Priya Dixit