सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024 (16:59 IST)

उद्धव ठाकरे, फडणवीसांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग निवडणूक आयोगाने तपासली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला वेग आला असून सर्व राजकीय पक्ष प्रचार सभा घेत असून निवडणूक दरम्यान बॅग तपासणी वरुण राजकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग तपासणी करण्यात आली.
अजित पवार यांच्या हेलीकॉप्टर आणि बॅग ची झड़ती घेण्यात आली असून त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. अजित पवार यानी स्वत्: हां विडिओ जारी करून हे सर्व स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 
या पूर्वी भाजपने व्हिडिओ जारी करूँ फडणवीस यांची बॅग 5 नोव्हेंबरलाच  तपासली गेली. हा सर्व निवडणुकीचा भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याच्या एक दिवसाआधी देखील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची देखील बॅग तपासण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या बॅग आणि हेलीकॉप्टरची 24 तासांत दोनदा तपासणी केल्यावर ते नाराज झाले असून त्यांच्या पक्षाने तपसणीचा व्हिडिओ शेअर केला होता. 

तपासणी कार्यात मी पूर्णपणे सहयोग दिल्याचे अजित पवार म्हणाले. ते निवडणूक प्र्चाराला जात असताना त्यांच्या हेलीकॉप्टर आणि  बॅगची नियमित तपासणी केली. 
Edited By - Priya Dixit