शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (10:14 IST)

एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतले कामाख्या देवीचे आशीर्वाद

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचले.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्ष तयारीला लागले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  
 
सीएम शिंदे हे मंगळवारी संध्याकाळी गुवाहाटीला पोहोचले आणि आज ते प्रसिद्ध माता कामाख्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येथे पोहोचले. येथे ते म्हणाले की, महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल.” तसेच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik