बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (16:19 IST)

लोकसभा निवडणूक फकीरा सारखी लढवली, जिंकेन विश्वास नव्हता -सुप्रिया सुळे

supriya sule
बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (एमव्हीए) अद्याप  मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून एक नाव देणे "कदाचित अशक्य" आहे

माविआच्या प्रमुख घटक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी निवडणुकीनंतरच योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री बनवणार. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि भावजय सुनेत्रा पवार यांच्याशी बारामतीच्या जागेवर होणाऱ्या चुरशीच्या लढतीबाबत सुळे म्हणाल्या की, "मी अनेक अडचणी असूनही लढत असल्याने ही निवडणूक जिंकेन याची मला शंभर टक्के खात्री नव्हती. ."

राष्ट्रवादीचे दोन गट पडले.त्यांनी पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देखील बळकावले. मी लोकसभा निवडणूक एका फकीरा प्रमाणे लढवली आणि त्यात जनतेमुळे मला यश मिळाले. सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा सलग चौथ्यांदा पराभव केला आहे.
Edited by - Priya Dixit