रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Updated : रविवार, 1 डिसेंबर 2024 (12:24 IST)

एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. पण, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडण्यासाठी महायुतीच्या सातत्याने बैठका सुरू आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

12:23 PM, 1st Dec
एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार!
 
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत साशंकता आहे. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होऊ शकले नाही, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बैठक मुंबईत होणार होती.सविस्तर वाचा .... 

11:11 AM, 1st Dec
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मोठी बातमी,अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं
महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत विजय होऊन आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झालेले नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकार स्थापनेबाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की भाजपकडे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री असेल

10:54 AM, 1st Dec
5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार,PM मोदीही उपस्थित राहणार
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे एकूण 16,416 आमदार, खासदार, विविध सेलचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष सहभागी होणार आहेत. सविस्तर वाचा ....