मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (12:11 IST)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

Maharashtra
महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या मोठ्या विजयानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच अशा परिस्थितीत आज संध्याकाळपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

12:11 PM, 26th Nov
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला
आज महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे. सविस्तर वाचा 

11:52 AM, 26th Nov
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहे.

11:07 AM, 26th Nov
खासदार कंगना राणौतने झालेल्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंना टोला लगावला
आता उद्धव ठाकरे यांच्या या पराभवावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राक्षसाशी केली आहे. सविस्तर वाचा 

10:20 AM, 26th Nov
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचणार, राज्यपालांकडे सुपूर्द करणार राजीनामा
महाराष्ट्रात सरकारचा नवा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी जुन्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यासाठी आज राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान राजभवनात पोहोचणार आहे. सविस्तर वाचा 


10:03 AM, 26th Nov
नागपुरात नव्या सरकारच्या स्वागताची तयारी सुरू, उपराजधानी हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झाली
नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात होणार आहे. उपराजधानीत नव्या सरकारचे स्वागत सुरू झाले आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास आदी ठिकाणी साफसफाई, रंगकाम, फर्निचरची दुरुस्ती, नूतनीकरण आदी कामे जोरात सुरू आहे. सविस्तर वाचा 

09:40 AM, 26th Nov
फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री! महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार, हा मुख्यमंत्र्यांचा नवा फॉर्म्युला
आज मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तसेच अशा परिस्थितीत आज संध्याकाळपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. सवीस्तर वाचा 

09:39 AM, 26th Nov
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून लोकांची मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, या इच्छेने राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना आणि महाआरतीचा सुरु झाली आहे. सविस्तर वाचा 
 

09:38 AM, 26th Nov
कॅबिनेट मध्ये दिसणार नवे चेहरे, 30 तारखेला होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या मोठ्या विजयानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. तसेच यावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे आमदार आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले. सविस्तर वाचा