शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (15:23 IST)

ठाण्यात रुग्णालयात रुग्णाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

rape
ठाण्यात रुग्णालयात रुग्णाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. 

मुलीच्या आईचे फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचारासाठी गेले असताना मुलीची ओळख आरोपीशी झाली त्याने मुलीला 20 जुलै ते 18 ऑक्टोबर दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार केला 
 
मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रविवारी कलम 74 महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर  हल्ला करणे किंवा बळजबरी करणे आणि कलम 75 (लैंगिक छळ) भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे संरक्षण नुसार गुन्हा दाखल केला. तसेच कर्मचाऱ्यावर बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पॉक्सो लागू केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केली नाही. 
Edited By - Priya Dixit