रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (12:09 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

Rajbhavan
Eknath Shinde News :  आज महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहे.
 
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सध्या मुंबईपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारी दिल्लीत पोहोचले आणि येथे बैठक झाली. मुख्यमंत्री कोण होणार हे अजून जाहीर झालेले नाही. 

Edited By- Dhanashri Naik