बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (13:12 IST)

कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घेतले, नाना पाटोळे यांचा दावा

nana patole
राज्य सरकारने आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कर्ज घेतले. विरोधीपक्ष राज्य सरकारवर आर्थिक अविवेकीपणा आणि महिलांसाठी मासिक रोख रक्कम हस्तांतरण योजनेसह कल्याणकारी योजनांसाठी निधी खर्च करत आर्थिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे यांनी केला आहे.

सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आर्थिक संकटामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. राज्य सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी निवडणुकीत लोकांवर हे निर्भर आहे.महाविकास आघाडी मध्ये जागावाटपाची चर्चा पुढे वाढत आहे. 

राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांच्या विरोधात काम करत आहे. असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देशात बदलचे वातावरण आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर मध्ये निवडणुकांचे निकाल चांगले येतील. महाराष्ट्र देखील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले प्रदर्शन करणार. येत्या नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहे. 
 Edited by - Priya Dixit